अर्थ : शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ.
उदाहरणे :
उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
अर्थ : साठ मिनिटांचा काळ.
उदाहरणे :
सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
अर्थ : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
उदाहरणे :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
समानार्थी : घंटा
अर्थ : वेळ सूचित करण्यासाठी वाजवले जाणारे उपकरण.
उदाहरणे :
घंटेचा नाद ऐकून मजूर जेवायला गेले.
समानार्थी : घंटा
अर्थ : एका तासात कापता येईल इतके अंतर.
उदाहरणे :
माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
समानार्थी : तासभर
तास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taas samanarthi shabd in Marathi.